हिलस्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळ्यातून एक धक्कादायक (Lonavala Crime News) बातमी समोर येत आहे. लोणावळयातील एका बंगल्यात अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या बंगल्यात वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणींसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”लोकसभेचं तिकीट मिळताच कंगनाचा जोरात प्रचार सुरू, राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणाली ‘त्यांना हिंदूंची शक्ती…’ https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-allegations-on-rahul-gandhi-in-mandi-nrps-519107.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यातील एका बंगल्यावर हा प्रकार सुरू होता. या बंगल्यात वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणी एकत्र राहत होते. 29 मार्चला सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हिला या बंगल्यावर अश्लील व्हिडिओचं शुटींग सुरू होतं. या बद्दल माहिती मिळताच, पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकत तरुण तरुणींसह 15 जणांना अटक केली. हे अश्लील व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
भारतात अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविण्याचा हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम 292, 293, 34 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.