हरियाणा: हरियाणा येथून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच गावातील १५ वर्षांच्या मुलीसोबत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ती ७ महिन्यांची गर्भवती देखील आहे. पीडितेचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
कसा आला प्रकार समोर?
पीडित मुलगी ही मेल दीड महिन्यांपासून अस्वस्थ होती. तिला उलट्या सुरु झाल्या होत्या. म्हणून तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी, औषधे देऊन सुद्धा तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. पीडितेची प्रकृती आणखी खालावत गेल्याने तिला डॉक्टरांकडे नेऊन तिचं अल्ट्रासाउंड करण्यात आलं. तेव्हा ही बाब उघडकीस आली. १५ वर्षीय अल्पवयीन पीडिता ही जवळपास सात महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आली.
गर्भपात करण्यासाठी दबाव
पीडितेला याबाबतीत विचारण्यात आले असता, तिने सांगितले की एक अल्पवयीन मुलगा तिच्यावर गेल्या सहा- सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. त्या तरुणाने पीडितेला तिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडितेच्या वडिलांनी त्या तरुणाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या या कृत्याबद्दल त्याला जाब विचारला. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनीच धमकी देत मुलीचा गर्भपात करण्यासाठी दबाव आणला.
घरी कोणी नसण्याचा घेतला फायदा
तरुणीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, पीडितवची आई मागील काही महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. तिचे वडील सुद्धा कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. सध्या, आरोपीला अटक केली असून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. येथील महिला पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल






