लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
वर्धा : चुलत सासऱ्याकडून लग्नाकरिता लावण्यात आलेल्या खर्चाच्या मागणीसाठी तगादा लावण्यात आला. अशातच मनोधैर्य खचलेल्या जावयाने आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल केला. नंतर गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोनेगाव स्टेशन येथे घडली.
अविनाश खुशाल दोड (वय 36, रा. सोनेगाव स्टेशन) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश दोड याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नासाठी चुलत सासरे बंडू सकंडे (रा. मदनी, ता. सेलू) यांनी खर्च केल्याचे सांगत लग्नासाठीचा केलेला खर्च परत करण्यासाठी अविनाशकडे बंडू सकंडे यांच्याकडून तगादाच लावला जात होता. याच पैशाच्या तगाद्याला कंत्राटाळून अविनाश याने आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय घेतला.
हेदेखील वाचा : Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती
इतकेच नव्हे तर त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपण चुलत सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर सोनेगाव स्टेशन शिवारातील भलकर व सोनटक्के यांच्या शेताच्या धुऱ्यावरील पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरातही तरूणीची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, 17 वर्षांच्या मुलीने मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आत्महत्येचा मार्ग निवडला. आधी तिने स्वतःच्या हाताची नस कापली आणि नंतर गळा चिरला. ही थरारक आणि विचित्र घटना धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता वर्धा येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?