पुण्यात गोळीबाराची घटना (फोटो - istockphoto)
गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रवींंद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गणेश आणि साथीदार ओंकार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिली.
पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण?
मोफत शिक्षण, नोकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला. पुणे मेट्रोच्या पुणे महापालिका स्थानकाजवळच्या रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी रुळासह वायरीचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.