प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6 सदस्यांवर झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू!

आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.

  बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन बंदूक उगारण्याच्या घटना बिहारमध्ये (Bihar Crime News) नेहमीच उघडकीस येतात. आता सध्या छटपुजेसारखा (Chhatpuja) सण सुरु असताना हत्यांकाड घडलं आहे. लग्नाला नकार दिल्यानं एका सनकी तरुणानं तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार (Man Shot 6 people in family) केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब बिहारमधील लखीसराय येथे छठघाटावरून पुजा करुन परते येत असताना हे हत्याकांड घडवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  लखीसराय एसपीच्या म्हणण्यानुसार, आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.
  गोळीबारात जखमी झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी सख्खे भाऊ असलेल्या दोन तरुणांना मृत घोषित केले. दोन्ही भावांच्या पत्नी, वडील व बहीण जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले सध्या हल्लेखोराचा शोध घेण्यात व्यस्त आहे.

  एकतर्फी प्रेमातून हल्लेखोराने केलं हत्याकांड

  लखीसरायचे एसपी पंकज कुमार यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील 6 लोक छठ घाटावरून परतत होते. त्याच्या घराजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्यावर गोळी झाडणारा आरोपी त्याचा शेजारी असून त्याचे नाव आशिष चौधरी आहे. हल्लेखोराचा या कुटुंबाशी 10 दिवसांपूर्वी वाद झाला होता. लखीसरायच्या पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण एकतर्फी प्रेमाचे आहे.

  त्याने सांगितले की, आशिष चौधरी नावाच्या तरुणाचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचा राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला.