संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले (फोटो सौजन्य: iStock)
सावनेर : सावनेर तालुक्यातील गुजरखेडी परिसरात एका मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
महिला गेल्या काही दिवसांपासून सावनेर परिसरात भटकंती करत होती. मंगळवारी रात्री नागपूर मार्गावरील एका धाब्याजवळ ती एकटी बसलेली असताना पेंढरी (ता. पारशिवनी) येथील 17 वर्षीय आरोपीने तिला झाडाझुडपात नेऊन जबरदस्तीने अतिप्रसंग केला. घटनास्थळी जवळच असलेल्या एका ऑटो चालकाने हा प्रकार पाहिला. त्याने तत्काळ समाजसेवक हितेश बनसोड यांना माहिती दिली. बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना सावनेर पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती आरोपीविरोधात विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मजुरीसाठी सावनेर येथे आला होता. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पीडित महिला स्वतःचे नाव व पत्ता स्पष्टपणे सांगू शकत नसल्यामुळे तिची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. ती वेळोवेळी वेगवेगळ्या गावांची नावे सांगत असल्याने पोलिस व समाजसेवकांनी तिच्या मूळ गावाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळू राठोड करत आहेत.
स्वत:च्या मुलीवर बापाचा अत्याचार
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापानेच सख्ख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केले. या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने बापाने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता मोठा खळबळजनक उलगडा मुलीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.