File Photo : Crime
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत एका 60 वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार; दारू पाजली अन्…
पीडित मुलगी धारावी परिसरात आई वडिलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने घरात प्रवेश करत मुलीला चाकूच्या धाकात धमकावले. आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास अॅसिड फेकण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरातील दागिनेही शोधण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान मुलीने आरोपीला चकमा देत घराबाहेर पळ काढला. काही वेळातच आई-वडील घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी पोलिसांत धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली.
विविध कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : गरिबांना मिळणार दोन खोल्यांचे घर, 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार; जाहीरनाम्यात काँग्रेसची कोणती आश्वासने?
शिरवळमध्ये अश्लील व्हिडिओ पाहून अत्याचार
शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. हे घृणास्पद कृत्य अल्पवयीन मुलांनीच केल्याचे उघड झाले आहे. मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.