Abused Of Two Girls In Pune 3 Accused Arrested Nrka
धक्कादायक ! बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार; दारू पाजली अन्…
14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत.
एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
(File Photo : Crime)
Follow Us:
Follow Us:
बारामती : बारामती परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या मुलींना दारु पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली. ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर चौथा आरोपी फरार आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबर रोजी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या.
खोलीवर नेले अन् अत्याचार केला
एसटी बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तोही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले.
दरम्यान, यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. 16 सप्टेंबर रोजी या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले.
दारू पाजून अत्याचार केल्याचे उघड
पोलिसांनी सविस्तर माहिती घेतल्यानंतर या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
पालकांनी सतर्क राहावे
पालकांनी आपली मुले व मुली यांच्यावर लक्ष ठेवावे. ते कोणत्या मित्र-मैत्रिणीच्या संपर्कात आहेत, याची माहिती घ्यावी. चुकीचा प्रकार आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
– डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
Web Title: Abused of two girls in pune 3 accused arrested nrka