संग्रहित फोटो
पुणे : भरधाव दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धायरीवरून धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लालबिहारी मनराज मौर्य (वय ५५, रा. धनगरवस्ती, धायरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लालबिहारी यांच्या २३ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी तक्रारदारांचे वडिल रात्री नऊच्या सुमारास धायरीकडून धनगरवस्तीकडे त्यांच्या घरी पायी चालत जात होते. तेव्हा पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीस्वारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार अपघातास्थळी न थांबता तसेच पोलिसांना याची माहिती न देता तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. अधिक तपास नांदेडसिटी पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; लॉजमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात
पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्तीजवळ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केाला आहे. सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३, रा. पांढरे मळा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक एकनाथ नवनाथ चोरमोले (वय २३, रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल लक्ष्मण कांबळे (वय ३३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.