कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे. एका नवदाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव सागर सुरेश करमळकर (३२) आणि त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६) असे या दाम्पत्याचे नाव आहेत. या दोघांचं लग्न महिन्याभरापूर्वीच झालं होत. या घटनेमुळे आजरा परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आली.
वर्दळीच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या, आरोपीचा शोध सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित सागर आणि सुषमा दोघेही रविवारी (१५ जून २०२५) दुपारच्या सुमारास आंबोलीत फिरण्यासाठी गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर ते आजरा येथील भावेश्वरी कॉलनीतील आपल्या घरी परतले. रविवारी रात्रीपासून त्यांचा फोन लागत नव्हता. कालांतराने त्यांचे फोन स्विच ऑफ झाले. त्यामुळे मित्रपरिवाराला चिंता वाटू लागली.
सोमवारी १६ जून रोजी सकाळी त्यांच्या मित्रपरिवाराने घरी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. सागर आणि सुषमा राहत असलेल्या घरामध्ये सर्वत्र गॅसचा तीव्र वास येत होता. यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने शोध घेतला तेव्हा दोघेही बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. गॅस गिझरमधून गॅसची गळती झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. सागर करमळकर यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शाहरुखच्या एन्काऊंटरनंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 60 जणांना घेतले ताब्यात