आपल्या मनकवड्या स्वभावासाठी कायम चर्चेत राहणारे बागेश्वर धाम (Man Died In Bageshwar Dham) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. एक तरुणाची तब्बेत ठिक होत नसल्याने तो बागेश्वर धाममध्ये उपचार करुन घेण्यासाठी आला. मात्र, तिकडे त्याला चक्कर आली आणि तो पंडित धीरेंद्र शास्त्रीसमोरच बाबांसमोर पडला. नातेवाइकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात (Man Died In Bageshwar Dham) आले. विजय कश्यप असे मृताचे नाव आहे. हा तरुण यूपीतील गोरखपूरचा रहिवासी होता.
[read_also content=”राजस्थानमध्ये आता मृतदेहासह निदर्शन करता येणार नाही; दोन ते पाच वर्षाची होऊ शकते शिक्षा, विधानसभेत कायदा मंजूर https://www.navarashtra.com/india/rajasthan-dead-bodies-respect-bill-passed-in-assembly-5-years-in-jail-for-protesting-by-keeping-deadbodies-bjp-opposes-the-bill-434719.html”]
मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, विजयच्या संदर्भात कुटुंबीय बागेश्वर धाम येथे आले होते. मनीषाने सांगितले की, तिचा मेहुणा विजय कश्यप याला झटके येत होते. विजय धाममध्ये बरा होईल, अशी कुटुंबीयांना आशा होती. मात्र त्याला चक्कर अचानक चक्कर येऊन पडली . सर्वजण त्यांना बागेश्वर महाराज पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडे घेऊन गेले. काही वेळ श्वास घेत होता. मग त्याने बोलणे बंद केले.
मृतकाची वहिनी मनीषा व सेवकाने सांगितले की वि धीरेंद्र महाराजांनी विजयला विभूती दिली व काही वेळ सेवाही केली, मात्र काही वेळाने विजयचा श्वास थांबला. त्याला बागेश्वर धाम येथून रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी विजयची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. काही काळ जिल्हा रुग्णालयात राहिल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गुजरातकडे रवाना झाले.
बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच वय अवघे २६ वर्षे आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गार्हा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांचे वडील रामकृपाल गर्ग गावातच सत्यनारायणाची कथावाचन करत होते. तर कधी कधी धीरेंद्र शास्त्रीही वडिलांसोबत कथा सांगण्ययास जात होते. त्यांच्या घरी दुध विक्रीचा व्यवसाय आहे. धीरेंद्र कृष्ण यांनी इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी कथा वाचन करण्यास सुरुवात केल्याचा त्यांनी सांगितलं.