सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन (File Photo : Death)
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यात फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून दिले आहेत. त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले. हेच फोटो पाहून बीड तालुक्यातील जाणेगाव येथील तरुण अत्यंत निराश झाला. याच नैराश्येत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशोक हरिभाऊ शिंदे (वय २३) असे त्या तरुणाचे नाव आहे. केज बंदमध्ये अशोक शिंदे या तरुणाने सहभाग नोंदवला होता. तेथून घरी आल्यानंतर त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणारी बहीण अश्विनी माने हिला फोन करून हळहळ व्यक्त केली. ‘मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे’, असे त्याने फोनवर सांगितले.
त्यानंतर अशोक शिंदे याची बहीण अश्विनी माने हिने समजूत काढली. अशोकने कॉल केल्याचे तिने सांगितले. त्यावेळी तो रडत होता. त्याला मी विचारले काय झाले? तर तो देशमुख साहेबांचे फोटो बघून मला वाईट वाटत आहे. तो टोकाचे पाऊल उचलणार, असे सांगत होतो. मी त्याला समजवले. त्यानंतर त्याने फोन स्विच ऑफ केला, असे अशोकच्या बहिणीने सांगितले.
धनंजय देशमुख यांच्याकडून सांत्वन
या आत्महत्येच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अशोक शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. फोटो पाहिल्यावर अशोक शिंदे भावना विवश झाला. तो नैराश्येमध्ये आला. केजच्या बंदमध्ये ते सहभाग झाला होता. दरम्यान, कोणीही असे टोकाचे पाऊल उचलून नये. ज्यांनी चुकीची घटना केली, त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्वांनी सोबत राहायचे आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
अशोकचा फोन आला होता पण…
दरम्यान, अशोक शिंदे याचा भाऊ शिवराज शिंदे यानेही यावर भाष्य केले. तो म्हणाला, ‘अशोक शिंदेचा फोन आला होता, पण मी कामात असल्यामुळे त्याचा फोन घेऊ शकलो नाही. नंतर दुसरा कॉल आला पण तो त्याने गळफास घेतल्याचा होता. हे ऐकून धक्काच बसला’.