सौजन्य - सोशल मिडीया
नागपूर : जेवण का बनवले नाही, या क्षुल्लक कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. ही घटना सिंगोरी कोळसा खाणीत गुरुवारी (दि. 20) घडली. ठेकेदाराच्या कामावर असलेला अजिंक्य देवेंद्र ढोके (वय 21, रा. सिंगोरी) याचा त्याच्या सख्ख्या धाकट्या भावाने अभिजीत देवेंद्र ढोके (19, रा. सिंगोरी) याने हत्या केली. ही घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हेदेखील वाचा : Dhule News: प्रेम प्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण, मग निर्घृण हत्या; फेकून दिले नाल्यात, शिरपूर तालुका हादरला
अजिंक्य ढोके हा रात्री कामावर असताना अभिजीत त्याच्याकडे आला आणि वडिलांना जेवण का बनवले नाही, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजीतने थोरल्या भावाला शिवीगाळ केली आणि जवळील लाकडी दांडक्याने डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यला सहकाऱ्यांनी उपचारासाठी तातडीने मेयो रुग्णालय, नागपूर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी हर्षल नंदू टोंगे (23, रा. सिंगोरी) यांनी पारशिवनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
तरुणाला डांबून केली मारहाण
शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील चार युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळा पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाल्यात आढळला मृतदेह
या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला असता तो या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही मारून टाकल्यानंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा संशय व्यक्त केला.