एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना बेनोडा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी निखिल दीपक सलामे (वय 34, रा. वरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : PCMC Crime News: देवाच्या आळंदीत दोन मुलींवर अत्याचार; पोलिसांनी महाराजाला ठोकल्या बेड्या
निखिलने 2018 मध्ये 24 वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात अडकविले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने पाच ते सहा वर्षांपासून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, निखिलचे दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जुळले. याबाबत माहिती मिळाताच पीडित तरुणीने निखिलला लग्नाबाबत विचारणा असता त्याने नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने बेनोडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी निखिलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील आळंदीत अत्याचाराची घटना
वारकरी सांप्रदायासाठी विशेष ओळख असलेल्या देवाच्या आळंदीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पाहणे म्हणून आलेल्या एका नराधमाने दोन मुलींवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या. ही घटना ताजी असतानाच देवाच्या आळंदीतच वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : ‘रेड लाईट एरिया’ची तपासणी आता होणार तरी कधी? सैफ अलीवरील हल्ल्यानंतर नागरिकांचा सवाल