अहिल्यानगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपी सुनील लोखंडे हा फरार झाला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अन्य गंभीर गुन्हे आरोपी सुनील लोखंडेवर दाखल आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.
सुनील लोखंडे हा गेल्या सहा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारासाठी त्याला कारागृहातून रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड आणि रुग्णालयातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आज मंगळवारी आरोपी सुनीलवर उपचार सुरु असतांना आरोपीने संधी साधत बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डची नजर चुकवली आणि रुग्णालयातून पळ काढला. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देत आरोपीने पळ काढल्याने पोलीस दल आणि रुग्णालय प्रशासना मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधीक्षकांवर केला होता गोळीबार
रुग्णालयातून फरार आरोपी सुनील लोखंडे याने याआधी पोलीस उपाधीक्षक संदीप मेटके यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेननंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि तो कारागृहात शिक्षा भोगत होता.आज मंगळवारी (१० जून) रोजी रुग्णालयात उपचार सुरु असतांना हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेने पोलीस दल आणि रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याघटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
उबेर बाईक चालकांकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ अन् मारहाण; गोरेगावमधील प्रकार