[blurb content=””]प्रत्येक निवडणुकीत रायगडमध्ये निवडणुकीच्या काळात काहींना काही वाद निर्माण होत असतात. गेल्या निवडणुकीमध्ये झालेला वाद अजून न्यायालयात चालू आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक २०२४ शांततेमध्ये पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क मोडवर आहे. जिल्ह्यात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. जर कोणी जिल्ह्यात सार्वजनिक शांतात भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली आहे. अश्याच कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी विविध कलमांतर्गत १,५८४ जणांवर कारवाई केली आहे.वादविवाद करण्यास प्रोत्साहन देणे, आपापसांत भांडण लावून देणे, हाणामारी करणे, प्रक्षोपक भाषण करून कायदा सुव्यवस्था बिघडवणे यांसारख्या गुहन्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर रायगड पोलीस सतर्क मोडवर आहेत. आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. राज्यात १६ मार्चला आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिमा राबवण्यात आल्या. निवडणुकीवेळी निर्माण झालेले वाद, पूर्व वैमनस्यतील वाद वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची संयुक्त समितीकडून पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्रे जमा करण्यात आली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला आयोगाकडून लागू करण्यात आलेले नियम पाळावे लागतात. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण २५ पोलीस स्टेशन आहेत. त्यातील १६९१ जणांना शस्त्र वापरण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. मात्र त्यातील ६९२ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.