File Photo : Crime
मालेगाव : शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाऊन गँगनंतर आता चड्डी बनियान गँगने धुमाकूळ घातला आहे. या चड्डी बनियान गँगने मध्यरात्री दोननंतर महाविद्यालय व घर फोडून रोख रकमेसह सहा तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली. ही चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, सततच्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्…
शहरात चोरटे वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरी करत असल्याने चोरट्यांनी जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोरी पाठोपाठ आता घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चड्डी बनियन व गाऊन परिधान करून चोरटे घर फोडी करत आहेत. यामुळे छावणी व कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सामान्य नागरिकांत गँगची दहशत
गेल्या काही महिन्यात शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. त्यातच आता अशा गँग सक्रीय झाल्याने नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. ही गँग पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता मालेगावात गाऊन गँगनंतर आता चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ पाहिला मिळत आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! भूतबाधेच्या नावावर एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार; वृद्धेलाही सोडलं नाही, अडीच वर्षांनंतर प्रकार उघडकीस