शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती (Photo Credit - X)
पंधरा शिक्षकांची केली नियमबाह्य भरती !
शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन व जालना जिल्ह्यात दोन शाळा आहेत. सर्व नियम डावलून अनधिकृत (धर्मदाय आयुक्तांची मान्यता नसलेल्या) कार्यकारणीने या शाळांत अनधिकृत शिक्षक भरती केली आहे. याबाबत आम्ही काही संस्थापक सदस्य, पदाधिकारी यांनी दोन वर्षापासून शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर व जालना याच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. शिक्षण विभागाने त्यांना साधी पौचही दिली नाही. दखल घेतली नाही. त्यानंतर शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. विद्यमान कार्यकारणीला धर्मदाय आयुक्त यांनी मान्यता दिलेली नाही. २०१६ पासून बदल अहवालास मान्यताही नाही. असे असताना विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण साकुडकर यांनी आपली मुलगी व इतर अशा पंधरा शिक्षकांची बेकायदेशीर भरती केली आहे.
सचिव म्हणतात.. संबंध नाही!
याप्रकरणी संस्थेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांना कळवण्याची विनती केली. मुख्याध्यापक शिदे यानी कॉल व व्हॉट्सअप मॅसेज करुन त्यांची कॉल आणि मॅसेजला प्रतिसाद न दिल्याने केले जात असलेले आरोप सत्य असल्याचे दिसते. तर संस्थेचे पदाधिकारी शेवाळे यांना देखील संपर्क साधला होता. ते म्हणाले, संस्थेत जो काही प्रकार झाला असेल त्याच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही, या संदर्भात मी माहिती घेऊन आपणास कळवतो असे स्पष्ट केले.
जाहिरात, मुलाखत, आहेत संशयास्पद
२४ मार्च २०१३ रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. २५ मार्च २०१३ रोजी मंडळ कार्यकारणीने त्यांना नियुक्ती दिली. २६ मार्च २०१३ रोजी शिक्षणाधिकारी यांनी नियुक्तीला मान्यता दिली. हे सर्व घडामोडी संशयास्पद आहे. एवढी तत्परता या अधिकाऱ्यांनी तक्रारीबाबत दाखवली नाही. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. यातील काही शिक्षकांना शाळा न्यायाधिकरण व उच्च न्यायालयात दाद मागायला मदत करून दहा, बारा वर्षापासूनचा पूर्ण पगार मागण्यास प्रवृत्त केले. शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.






