धी बिबट्याची डरकाळी, मग घरासमोरच...; शेतकरी कुटुंबाचा दोन तास जीव मुठीत (Photo Credit- AI)
बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतातून बिबट्या डरकाळी मारत वाड्यासमोर आला. यानंतर बिबट्याने तेथेच दोन तास ठिय्या मांडल्याने वाड्यामध्ये राहणाऱ्या महिला लहान मुले भयभीत झाले होते. त्यांनी लगेच वाड्याचा दार लावून बिबट्या वाड्याजवळ बसण्याची माहिती गावातील नातेवाईकांना दिली. या घटनेची माहिती मिळताच याकूब खा आयुब खाँ, अहमद खा दलमीर खा, सादिक खान उस्मान खान, शाहरुख तडवी, हसन खान, समीर खान, इस्माईल खा गुलाम खा यांच्यासह चाळीस-पन्नास लोकांनी शेतातील वाड्यावर धाव घेऊन आरडाओरडा केली. या आवाजामुळे बिबट्याने वाड्यासमोरून धूम ठोकली अन सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!
अजिंठा परिसरात सुरुवातीला एक असलेला बिबट्या, त्यानंतर दोन पिल्लांसह दिसलेला मादी बिबट्या आणि आता तर अनेक ठिकाणी बिबट्या दिसून येत आहेत. अजिंठा, परिसरात बिबट्याचा पशुधनवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा झाल्या आहेत. मात्र आता अंधारी शिवारात रात्री बिबट्याने वाड्यावर ठिय्या मांडल्याने शेतकऱ्यांना शेत सोडून गावात जाण्याची वेळ आली आहे. बिबट्या आल्यापासून येथील नागरिक व शेतकऱ्यांतून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्षामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडल्यानंतर वन विभाग गांभीर्य लक्ष देणार का? असा सवाल संतप्त शेतकरी, नागरिकांनी केला आहे. अजिंठा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बिबट्याची वाढती संख्याआणि त्यांचे मानवी वस्तीवर हल्ले हा चिंतेचा विषय बनत आहे. गेल्या दोन महिन्यापासून अजिंठा शहराच्या वेशीवर बिबट्याने धडक मारली असून भर दिवसा तो फिरताना दिसत आहे.
सहाय्यक वन सरक्षक स्वप्नील भामरे म्हणाले, अजिंठा वनपरिक्षेत्रातील बिबट्यासंदभर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश देणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतः सह आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, एकट्याने फिरणे टाळावे. तसेच, ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष मंगेश सनान्से म्हणाले की, 66 वरिष्ठ अधिकाऱ्याने तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे निवेदन दिले परंतु अद्याप पर्यंत बिबट्यांना जेरबंद करण्याची वनविभागाने कोणतेही प्रयत्न दिसत नाही आपण तात्काळ दखल न घेतल्यास शेतकऱ्यासहित रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.






