प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं (Nitin Desai Sucide) हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते आर्थिक विंवचनेत होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. स्वकष्टाने उभारलेल्या कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
[read_also content=”क्रूरतेचा कळस…शारिरिक अत्याचाराचा महिलेनं केला विरोध, पिसाटलेल्या नराधमानं आधी केला खून, मग मृतदेहावर अत्याचार https://www.navarashtra.com/crime/a-man-killed-a-women-and-rape-with-her-dead-body-in-dehradun-uttarakhand-nrps-439814.html”]
अमोल कोल्हे म्हणाले, ‘हे खूप शॉकिंग आहे. खूप वर्ष आम्हीसोबत काम केलं आहे. फायटिंग स्पिरिट असणाऱ्या माणसाबाबत अशी बातमी ऐकायला मिळणं हे शॉकिंग आहे. मराठी माणसाची मान बॉलिवूडमध्ये त्यांनी उंच केली. आम्ही जवळपास सहा-सात वर्ष एकत्र काम केलं. दादांच्याबाबतीत अशी बातमी समोर येत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.’
मोठी स्वप्न पाहणारा, ज्याच्याकडे पाहून इतरांना बळ देणारा नितीन देसाई गेला. बालगंधर्वांसारखा प्रेक्षकांना भव्य दाखवण्याचा हव्यास होता, मेहनती होता. त्याच्याविषयी आदर आणि अभिमान होता. असं सुबोध भावे यांनी म्हण्टलं आहे.
नितीन देसाई यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. यावर मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, नितीन दादा यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला आहे. पुण्यात एका फिल्म स्कूलबाबत आमचं बोलणंही सुरु होतं. अचानक ही बातमी आली आहे. तो खूप मोठा माणूस होता. त्यांनी ऐवढं मोठ पाऊल का उचललं? खूप मोठा धक्का आहे असं ते म्हणाले.
तो खूप मोठा व्हिजनरी माणूस होता. त्यांच्या अचानक जाण्याने कधीही भरुन न निघणारी ही हानी झाली आहे. कला दिग्दर्शन काय असतं? हे त्यांच्या कामाकडे बघून कळतं. तो दमदार माणूस होता. त्यांना असं का वाटलं असेल? कशामुळे हे घडलं असेल? मला काय बोलावं समजत नाही. असं अभिनेता जितेंद्र जोशीने सांगितलं.
नितीन देसाईच्या निधनाचे वृत्त ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे, असे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी म्हटले. नितीन देसाई माझ्यावर खूप प्रेम करायचे. आम्ही झपाटलेला-२ हा चित्रपट थ्रीडीमध्ये केला तेव्हा त्याचे प्रॉडक्शन डिझाईन नितीन देसाई यांनी केले होते. असं महेश कोठारे यांनी सांगितलं.