अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्यास गंडा (File Photo : Fraud)
नागपूर : डब्ल्यूसीएल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 96 जणांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपी राकेश खुराणा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश खुराणा याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण सुनावणीदरम्यान खुराणानेच वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आठवडाभराची मुदत देत सुनावणी तहकूब केली.
हेही वाचा: Cyber Crime: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तरूणाला लुटले; तब्बल २१ लाखांना घातला गंडा
नागपुरातील हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ न्यायालयात खटल्याच्या सुनावणीत कोणतीही प्रगती झाली नसल्याने उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून सध्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. राकेश खुराणा याच्याविरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तक्रारदार प्रकाश आडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने बीई आणि एमटेकचे शिक्षण घेतले आहे. ती बेरोजगार होती व सरकारी नोकरीच्या शोधात होती.
यावेळी रमेश कामोने याने मानेवाडा येथील रहिवासी शिल्पा पालपर्थी हिच्याशी ओळख करून दिली व प्रकाश यांच्या पत्नीला डब्ल्यूसीएल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळू शकते, असे सांगून 10 लाख रुपयांची मागणी केली. प्रकाशने एनईएफटीद्वारे रमेश कमोने याच्या खात्यात 2.38 लाख जमा केले. 29 मे 2020 रोजी, शिल्पाने पुन्हा संपर्क साधला आणि डब्ल्यूसीएलमध्ये लिपिक पदाच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली.
दिल्लीहून बनावट नियुक्तिपत्र
डब्ल्यूसीएल कार्यालयातच शिल्पाने सांगितले की, स्टेट बँकेत पद रिक्त आहे. त्यासाठी त्याला दिल्लीला जावे लागणार आहे. प्रकाश आपल्या पत्नीसह दिल्लीला पोहोचले. तिथे पोहोचल्यावर एका लिपिकाने त्यांना नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्रे घेऊन दोघेही नागपुरात परतले. त्यानंतर नोकरीसाठी औरंगाबादच्या सिडको शाखेत पोहोचले, तेथे त्यांना नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 96 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाला गंडा
पुण्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २६ लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत ३१ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाशी मोबाइलवर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. त्याचा विश्वास संपादन केला. नंतर तरुणाने गुंतवणूकस्वरूपात चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले.
हेदेखील वाचा : Cyber Crime: पुण्यात नेमकं चाललंय काय? गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल…