नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणतीही त्रुटी काढल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ ओनरशिप) करून देण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने 400 रुपयांची लाच मागितली. दलालाच्या माध्यमातून पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने दोघांनाही पकडले. या कारवाईने ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Firing : मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ गोळीबार, एक जण गंभीर जखमी, हल्ल्यामागचं कारण काय ?
अश्फाक मेहमूद अहमद (वय 57) आणि मिर्झा असराग अकरम बेग (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अश्फाक हे ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. दुसरा आरोपी मिर्झा हा तेथे दलालीचे काम करतो. भालदारपुरा परिसरात राहणारे फिर्यादी एक ऑटोडीलर आहेत. त्यांनी त्यांच्या बहिणीसह ओळखीतील इतर दोघांच्या वाहनांची मालकी बदलण्यासाठी ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार किती आतपर्यंत फोफावला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
पैसे दिल्याशिवाय किंवा दलालाची मदत घेतल्याशिवाय आपले काम होणार नाही, याची या विभागात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाला चांगली जाणीव आहे. त्यातही ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिक बदनाम आहे. येथे सामान्य नागरिकांची कामे होवो अथवा नाही, दलालांची कामे तत्काळ केली जात होती. मात्र, गत काही दिवसांपासून येथील अधिकारी आणि दलालांमध्ये मतभेद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आपला शिक्का लावून अधिकाऱ्यांकडे कागदपत्र पाठवत होते आणि तत्काळ त्यांचे काम होत होते.
अधिकारी आणि दलालांमध्ये मतभेद
प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज केला होता. अश्फाकने त्यांचे काम कोणतीही त्रुटी न काढता झटपट करून देण्यासाठी 400 रुपयांची लाच मागितली. ऑटोडीलरने एसीबीकडे याची तक्रार केली. 3 जानेवारी रोजी एसीबीने तक्रारकर्त्यासोबत दोन पंचांना अश्फाककडे पाठवून पडताळणी करण्यात आली. तक्रार खरी निघताच अश्फाकला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
तक्रारकर्त्याने घेतली अश्फाकची भेट
ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारकर्त्याने अश्फाकची भेट घेतली असता त्याने दलाल मिर्झा असरागच्या माध्यमातून 400 रुपये घेतले. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने असरागला अटक केली. त्यानंतर अश्फाकलाही पकडण्यात आले. त्याच्यांकडून लाच रक्कमही जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध कपिलनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: देशमुखांच्या भावाचे विष्णु चाटेला 36 कॉल…;सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा