वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला (फोटो- सोशल मीडिया)
वाल्मीक कराडने केला होता कोर्टात जामिन अर्ज
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तुरुंगात
हायकोर्टाने फेटाळला जामिन अर्ज
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्याने जामिन मिळवा यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. वाल्मीक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा भोगत आहे.
वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्यावर आरोप झाले. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. वाल्मीक कराड पोलिसांसमोर शरण आला होता.
वाल्मीक कराड सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यानंतर वाल्मीक कराडने जामिन मिळावा म्हणून हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मीक कराडचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?
मूळचा परळी तालुक्यातील असलेला वाल्मिक कराड हा पांगरी गोपीनाथ गड गावचा रहिवासी होता. शेतकरी कुटुंबात वाल्मिकचा जन्म झाला. घरची परिस्थितीतीही हालाखीची होती. वाल्मिकने दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. पैसे मिळवण्यासाठी त्याची कसरत सुरू होती. त्यासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणायचा आणि गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसेही घ्यायचा. हे सर्व सुरू असतानाच वाल्मिक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला ठेवलं. घरात भाजीपाला, किराणा सामान, दूध, घरातली घरगड्याची छोटी -मोठी कामं वाल्मिक करू लागला. हे सर्व करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासही संपादन केला.
Who is Walmik Karad: परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?
हळूहळू वाल्मिक कराड परळीतील थर्मल प्लान्टमध्ये कंत्राट मिळू लागली. कराडच्या पाठिशी मुंडेंचं नाव जोडलं असल्यामुळे परळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला होता. 1995 मध्ये त्याची वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत तुफाण हाणामारी झाली. हा सराजा सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांनी बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट वाल्मिकच्या पायाला लागली. त्यानंतर तो गोपीनाथ मुंडेचा त्याच्यावरचा विश्वास अधिकच वाढला.






