ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. पोलिसांकडूनच वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र आता पोलिसच ऑनलाईन फसवणूकीचा शिकार झाल्याचे समोर आले आहे. बदलापूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जवळपास १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर लाखांचं लोनही काढल्याचे समोर आले आहे. हा प्रकार प्रमोद कोळी या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडला आहे. त्याने या प्रकरणाची तक्रार कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास करीत आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात प्रमोद कोळी हे कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन धक्का बसला. कारण त्यांच्या बँक खात्यातून साडे चार लाख 27 हजार रुपये काढले गेले होते. इतकेच नाही तर त्यांच्या नावाने 8 लाख 90 हजार रुपयांचे जंम्बो लोन काढले गेले. प्रमोद कोळी यांनी एचडीएफसी बँकेत जाऊन या प्रकरणी चौकशी केली. सत्य कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रमोद कोळी यांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना सांगितली.
मेल आयडी काढून दुसरा मेल आयडी लिंक
त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कोळीचा मेल आयडी काढून दुसरा मेल आयडी लिंक करण्यात आला होता. यातून हा सर्व घोळ झाल्याचा पोलीसांचा दावा आहे. त्यामुळे या मागे नक्की कोण आहेत. हे सायबर गुन्हेगार कोण आहेत याचा शोध पोलीसांना घ्यायचा आहे. त्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे एका पोलीसाला पोलीस कसे न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…
कल्याण येथुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री करणं चांगलाच भोवलं आहे. अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर या नराधम आरोपींनी तिच्यासोबत संबंध प्रस्तापित करून तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला. तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.