बारामती: बारामतीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली. यात पुतण्याचा जीव गेला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पुतण्याला मारहाण केल्यानंतर हे दोघे बाप- लेक तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाप लेकाला अटक केली आहे.
स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या जागेत बाथरूम का बांधले हे विचारणा करण्यासाठी सौरभ विष्णू इंगळे हा गेला होता. त्याने इंगळे वस्तीवर प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे भांडणात रुपांतर झाले. या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केली. सौरभच्या चुलत भावने सौरभला बारामतीच्या दवाखान्यात आणले. या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती देखील सौरभने पोलिसांना दिली होती. बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे यादरम्यान प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी सौरभ विरोधात फिर्याद दिली.
तपास सुरु
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहे. पोलीस पुढील तपास करीत असून पुढील कारवाई काय करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना ६ ऑगस्ट रोजी घडली होती. एका माथेफिरूने अचानक कोयत्याने एका तरुणावर हल्ला केल्याचे समोर आले होते. भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी पळत असतांना अचानक जमिनीवर कोसळून एक महिला गंभीर जखमी झालेल्या. बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) या विवाहित महिलेचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला.