काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आहे. तेरा मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातीलच एका तरुणीने करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमोर चंद्रहारला थोबाडीत मारले असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चंद्रहार हा मानसिक तणाव आणि नैराश्यात गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
हा माझा शेवटचा फोन…
14 मे रोजी सायंकाळी चंद्रहार यांनी आपल्या वडिलांना फोन केला, हा माझा शेवटचा फोन आहे यापुढे माझा फोन येणार नाही असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याने आपला फोन बंद केला. हे ऐकून कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. चंद्रहार त्यानंतर करेवाडी शिवारातील मुंगळाचा माळ येथे गेला. तिथे त्यांनी लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. चंद्रहारच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो त्याच्या वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
गुन्हा दाखल
याप्रकरणी चंद्रहारच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे होते.
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील मोहा गावात घडली.
Ans: पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






