(फोटो सौजन्य: Instagram)
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
माहितीनुसार, हे मंदिर हिमाचल प्रदेशच्या डोंगरामध्ये वसले आहे. याची निर्मिती सत्य भूषण नावाच्या एका कलाकराने केली. मुख्य म्हणजे हे बनवण्यासाठी त्याने कोणत्याही फंडिंग किंवा कामगारांची मदत घेतली नाही तर स्वबळाने आणि स्वकष्टाने त्याने आपल्या स्वप्नतलं मंदिर उभारलं. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ७००० फूट उंचीवर वसलेले आहे. इतक्या उंचीवर काम करणे म्हणेजे काही साधी गोष्ट नाही. सत्यभूषणने कधीही हार मानली नाही आणि तब्बल ४० वर्षे या मंदिराला दिल्यानंतर त्याच्या स्वप्नातल्या मंदिराला त्याने सत्यात साकारुन दाखवलं.
व्हायरल होत असलेल्या मंदिराच्या या व्हिडिओमध्ये इथली सुबक कारागिरी स्पष्ट दिसून येते. यात अनेक वेगवेगळ्या आकृत्या, मूर्त्या आणि डिजाईन्स पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे बाकी मंदिरांपेक्षा या मंदिराचे साैंदर्य काहीसे वेगळे आहे. हे मंदिर श्रद्धा, संयम आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरु नका.
दगड, सिमेंट आणि धातूच्या तारा वापरून या मंदिराला तयार करण्यात आले आहे. हे एक शिवमंदिर असून हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील चैलया या सुंदर हवेच्या ठिकाणी ते वसले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही रेल्वे किंवा विमान पर्यायाचा वापर करु शकता.
विमानाने : मुंबई विमानतळावरून (BOM) चंदीगडसाठी (IXC) थेट विमान पकडा. प्रवासाची वेळ अंदाजे २ तास आहे. तिथून चैलया शहराला जाण्यासाठी (अंदाजे ८५ किमी) टॅक्सी किंवा बस करू शकता.
रेल्वे : मुंबईहून पश्चिम एक्सप्रेस किंवा मुंबई – अमृतसर एक्सप्रेस ने अंबाला (UMB) किंवा कालका (KLK) पर्यंत प्रवास करा. तिथून पुढे टॅक्सीने चैलया शहराला पोहोचता येईल. इथेच हे मंदिर वसले आहे.






