गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचे शुल्लक कारणावरुन एका दुचाकी चालकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जवळपास एक तास प्रवासी ताटकळत होते. ही घटना मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली आहे.
Satara Crime: मोबाईलची तक्रार करायला गेला आणि परतलाच नाही, दुकानात चप्पलची घाण आल्याने वाद आणि…
नेमकं काय घडलं?
अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच 14 एल एक्स 5177 ही गडचिरोली वरुण मुलचेरा मार्गे अहेरीकडे येत होती. अरुंद रस्त्यामुळं बस वाहकाने दुचाकीस्वार व्यंकटेश गाजर्लावार रा. कोपरअली यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी दुचाकीस्वाराने वाहकास शिवीगाळ केली आणि बाचाबाची वरुन वाहक सुहास हंबर्डे यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळं वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.
मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वराला अटक
वाहक सुहास हंबर्डे यांनी अहेरी एस टी आगार आणि पोलिस स्टेशन मुलचेरा यांना भ्रमणध्वनीने यांना माहिती दिली. काही वेळातच मुलचेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहक सुहास हंबर्डे यांना मुलचेरा रुग्णालयात दाखल केले आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजर्लावार यास अटक करण्यात आली आहे.
चारित्र्याचा संशय, दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा दाबला गळा आणि… गडचिरोली हादरलं!
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन ही हत्या करण्यात आल्याच्या समोर आले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोनापूर गावजवळील जंगल परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, मृतकाचे आणावं टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (वय 34) असे आहे. आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (वय 34, रा. सोनपूर) आहे. या दाम्पत्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना नऊ आणि पाच वर्षांचे दोन लहान मुलं आहेत. आईच्या मृत्यूनंतर या निष्पाप मुलांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.
कशी करण्यात आली हत्या?
आरोपी पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडचिडा व संशयी असून, तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार शंका घेत असे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. 31 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने पायी घेऊन निघाला. सोनपूर-गोडगुलदरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतप्त झालेल्या पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडून तिच्या छातीवर बसत गळा दाबून तिचा खून केला.