सातारा: सातारा येथील कराडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात तरुण ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू झाला आहे. यावेळी दुकानात फारशी पुसण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानातील फरशीवर आल्याने वादाला सुरुवात झाली.यावेळी दुकानातील कर्मचारी आणि अखिलेश नलावडे यांच्यात झटापट झाली आणि अखिलेश जमिनीवर पडला. तो जमिनीवर पडल्यानंतर त्याची शुद्ध हरपली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजीम मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला; दुचाकीवरून आले आणि झाडल्या गोळ्या
सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार भर दिवस करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याचे नाव रियाज उर्फ मन्या इकबाल शेख असे आहे. तो या गोळीबारामध्ये जखमी झाला आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
२०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. याचाच बदला घेण्यासाठी रियाजवर गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा आता शिरवलमध्ये सुरू झाली आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची चर्चा सुरु आहे. या गोळीबारामध्ये रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत. २०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी म्हणून रियाज शेखला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. वाई कोर्टामध्ये केस सुरु आहे. आता त्याच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Thane News : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अपघात, 7व्या मजल्यावरून पडून स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू