भाजप नेत्याने विष पिऊन संपवलं आयुष्य
Nasrapur Crime News: छातीवर व्रण, तोंडात बोळा…! नसरापूर प्रकरणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर
२ एप्रिल रोजी विनोद मिश्रा यांची पत्नी आरती लग्नाला जात आहे असं सांगत माहेरी गेली आणि परत आलीच नाही. पती विनोद मिश्री जेव्हा तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले तव्हा पत्नीच्या कुटुंबियांनी त्यांना भेटू दिले नाही. यानंतर त्यांनी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावले पण यावेळीही पत्नी तिथे हजर झाली नाही. बुधवारी ३८ वर्षीय विनोद त्याचा मित्र मनीषसोबत रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेला होता. गुरुवारी तेथून परतल्यानंतर तो प्रसाद देण्याच्या निमित्ताने सासरच्या घरी गेला, जिथे पुन्हा त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. असा आरोप आहे की, भांडणानंतर त्याने घराबाहेर विषारी पदार्थाचे सेवन केले. यादरम्यान त्याने नऊ मिनिटांचा व्हॉइस रेकॉर्डिंग देखील बनवला ज्यात आपल्याला होणाऱ्या त्रासाचे त्याने वर्णन केले. यात त्याने म्हटले की, “मला मरायचे नव्हते, परंतु सासरच्या लोकांनी त्याचा इतका मानसिक छळ केला की त्याला हे पाऊल उचलावे लागले”.
विषप्राशन केल्यानंतर विनोदची प्रकृती खराब होऊ लागली ज्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्राने कुटुंबियांनी याची माहिती दिली. कुटुंबियांनी त्याला तत्काळ एलएलआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने शेअर केलेल्या व्हाईस रेकाॅर्डिंगमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींनी आरोपी घोषित करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बर्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी रवींद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुरावा म्हणून व्हॉइस रेकॉर्डिंगचीही तपासणी केली जात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये काय म्हटले?
“मला सर्वांना सांगायचे आहे की, मला मरायचे नव्हते, पण माझ्या सासरच्या मंडळींनी माझ्या मृत्यूची संपूर्ण योजना आखली होती. त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा कट रचला होता. त्यांनी माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. यामध्ये माझी पत्नी आरती मिश्राची आई, मिथलेश कुमारी, तिचा भाऊ, विकास तिवारी, माझ्या मामाचा मुलगा, सुनील तिवारी, माझी बहीण, अंजू आणि तिचा नवरा यांचा समावेश आहे. मी खूप चांगले आयुष्य जगत होतो; प्रत्येक सण आणि वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे कोणालाही दिसू शकत होते. माझी सासू बऱ्याच काळापासून माझा छळ करत होती. घराची तोडफोड करणे आणि माझ्या पत्नीची फसवणूक करणे हे तिच्यासाठी अगदी सोपे काम होते. माझी पत्नी तिच्या लहरीपणाला बळी पडायची आणि ती याचा गैरफायदा घ्यायची. तरीही, मी कसेबसे माझे कुटुंब एकत्र ठेवले होते. ही घटना २ एप्रिल रोजी घडली. मी सकाळी ऑफिसला जात होतो. माझी पत्नी स्वयंपाक करत होती. मी जेवून ऑफिसला निघालो. माझी पत्नी, मुलगी पिहू, मुलगा कार्तिक आणि अटल माझ्या घरी होते. माझी पत्नी पिहू, घरातील सामान आणि दागिने घेऊन निघून गेली. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की या लोकांना उघडकीस आणावे. माझ्या मृत्यूला सुनील तिवारी, सासू मिथलेश कुमारी, विकास तिवारी, बहीण अंजू आणि तिचा नवरा जबाबदार आहेत. आता माझ्याकडे काहीही उरले नसल्याने मी आत्महत्या करत आहे”.






