काळाचौकी येथे प्रेमाचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडच्या चाकू हल्ल्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू (Photo Credit- X)
मुंबई: मुंबईतील काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी एका अत्यंत धक्कादायक घटनेत, एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर आरोपी तरुणाने हल्ला केल्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील रहिवासी असलेला सोनू बरई (२४) याने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याची माजी प्रेयसी मनीषा यादव (२४) हिच्यावर हल्ला केला. दोघांचे नाते तुटल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी ही घटना घडली. बरईला मनीषाचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते आणि त्यांनी आपले नाते तोडले होते. बरईने शुक्रवारी सकाळी मनीषाला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्याने सोबत स्वयंपाकघरातील धारदार चाकू घेतला होता.
Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, सोनू बरईने रस्त्यावर अचानक तरुणीवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी मनीषा जवळच्या एका नर्सिंग होममध्ये धावली. हल्लेखोर तिच्या मागे नर्सिंग होमच्या आत गेला आणि तिच्यावर अनेक वार केले. स्थानिक नागरिक आणि नर्सिंग होम कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, बरईने स्वतःवर चाकू फिरवला आणि आपला गळा कापला. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. धारदार चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा यादव हिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि मुलीचे दुसऱ्या कोणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांचे ब्रेकअप झाले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या






