भंडाऱ्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मावस भावाकडून अत्याचार व मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी मिळाल्यामुळे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याआधी तिने सुसाईड नोट लिहून ठेवले. सुसाईड करण्याआधी तिने आरोपींची नावे लिहून त्यांना तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवले आहे.
नेमकं काय प्रकरण?
मृत पीडित तरुणी ही शिक्षण घेण्यासाठी तिच्या मावशीकडे राहत होती. मावशीच्या मुलांनी तरुणीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी सुरुवातीला तरुणी काहीही बोलत नव्हती. मात्र वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे ती त्रस्त झाली आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची बाब तिने मावशीला सांगितली. मात्र,बहिणीच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या आपल्या लेकाला रागवण्याची मावशीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व पीडितेलाच ती धमकाऊ लागली.
पीडित तरुणी ही सततचा अत्याचार आणि मावशीच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या धमकीमुळे ती त्रस्त झाली. साधारण पंधरा दिवसांपूर्वी मृत युवती ही वडिलांच्या घरी परतली होती. मात्र, १५ ऑगस्ट रोजी तिने घरी कोणीही नसल्याची संधी साधून नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने छळणाऱ्या आरोपींची नावे सुसाइड नोटमध्ये लिहून तेच माझ्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ही घटना मोहरणा येथे घडली.
या प्रकरणी पोलिसांनी इटान येथील राजेश रमेश गजभिये, नंदा रमेश गजभिये, राहुल रमेश गजभिये, रमेश गजभिये व शालू ऊर्फ शीतल ओंढरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणी ही गेल्या दोन वर्षांपासून इटान येथील सदर आरोपींसोबत राहत होती. . यादरम्यान आरोपी राजेशने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. ही बाब इतर आरोपी नातेवाइकांना कळल्यावर त्यांनी संगनमत करून तिला मारहाण केली तसेच प्रकरण बाहेर उघड न करण्यासाठी दबाव आणला.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फिर्यादी सूरज रामदास घोडे (२५, रा. घरकुल, चिखली) यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, रा. घरकुल, चिखली), राजा युवराज हजारे (२८, रा. घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, रा. थेरगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
Delhi CM Attack: कोण आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला करणारा? गुजरातशी आहे कनेक्शन