'हॉटेल रेटिंग'च्या आमिषाने व्यावसायिक युवतीला दीड लाखांचा गंडा (Photo Credit - AI)
या प्रकरणी रुपाली सखाराम आढावे (वय २५, रा. एकतानगर, हर्सूल) यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपाली आढावे सुतगिरणी चौक येथे ‘आर.एस. मॉकटेल हाऊस’ नावाचे दुकान चालवतात. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी त्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रील्स (Reels) पाहत असताना, त्यांना एक लिंक दिसली. या लिंकवर हॉटेल्सना रेटिंग दिल्यास घरबसल्या हजारो रुपये मिळतील, असा मजकूर होता. उत्सुकतेपोटी त्यांनी ती लिंक उघडताच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून चॅटिंग सुरू झाले. समोरील व्यक्तीने स्वतःला एचआर असिस्टंट असल्याचे सांगत दररोज पाच ते आठ हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अंजापार चेट्टीनंद नावाच्या हॉटेलला रेटिंग दिले आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवला.
Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…
पुढील टप्प्यात त्यांना धरानी गोखले नावाच्या टेलिग्राम ग्रुपकडे वळवण्यात आले. तिथे नाव, वय, बँक खात्याची माहिती मागवण्यात आली. माहिती दिल्यानंतर त्यांच्या पेटीएम खात्यात १८० रुपये जमा झाले. एवढी रक्कम मिळाल्याने रुपाली आढावे यांचा विश्वास बसला. दुसऱ्या दिवशी मनिष रेड्डी नावाच्या टेलिग्राम अकाऊंटवरून नवा ‘टास्क’ पाठवण्यात आला. यात आठ टास्कपैकी पाच मोफत होते, मात्र उर्वरित तीन टास्क पूर्ण करण्यासाठी अकरा हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.
फिर्यादींनी फोन-पेच्या माध्यमातून दिलेल्या युपीआय आयडीवर ही रक्कम भरली. त्यानंतर त्यांना अनिशा टप्पा नावाच्या दुसऱ्या टेलिग्राम अकाऊंटवर संपर्क करण्यास सांगण्यात आले. रुपाली आढावे यांनी वेगवेगळ्या युपीआय आयडीवर टप्याटप्याने एकूण १ लाख ६५ हजार रुपये पाठवले. इतके पैसे भरूनही त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. उलट, आरोपींनी त्यांना ‘अजून २ लाख २९ हजार रुपये भरल्यास एकूण पैसे मिळतील’ असे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुपाली आढावे यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी फसवणूक करणारे टेलिग्रामधारक धरानी गोखले, अनिशा टप्पा यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati Crime: २ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश






