child marraige (फोटो सौजन्य - social media)
बाल विवाह करणे गुन्हा असूनही ग्रामीण भागात बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे नुकताच नागपूर जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी दोन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. आता यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातून बालविवाहची घटना समोर आली आहे
मारेगाव तालुक्यातील गोडगुरांडा येथील बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. शहरातील पालकांसह ग्रामीण विभागातील बहुतांश पालक वर्ग सुशिक्षित असून मात्र गरिबी हलाकीची परिस्थिती यामुळे लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जातात. बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेण्यात आली. सदर वधू कुटुंबीयांची समजूत काढण्यात तहसीलदार उत्तम निलवाड यांना यश आले आहे.
यवतमाळ हादरलं; दुहेरी हत्याकांड, कौटुंबिक वादातून हत्या
यवतमाळ शहरात एकाच दिवशी हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालत त्याचा निर्घृण हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करत जावयाची हत्या केली. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपळगाव परिसरातील बालाजी मंगल कार्यालयाजवळ नृत्य प्रमोद हा उभा होता. यावेळी त्याचा लहान भाऊ कवीश्वर तेथे आला तसेच दोघांमध्ये कौटुंबिक काढणातून वाद झाला. त्यानंतर काही क्षणातच कवीश्वरने लोखंडी रोडने प्रमोदच्या डोक्यावर आठ ते दहा वार केले. यात प्रमोद चा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहे.
तर यवतमाळ शहरात दुसरी घटना ही भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून घडली आहे. भांडणात मध्यस्थी केल्याने जावयाची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. शेरूचा 19 वर्षापूर्वी राधिकाशी प्रेम विवाह झाला होता. राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता त्यावेळी वाद वाढू लागल्याने मध्यस्थी केल्याच्या रागातून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात शेरू गंभीर जखमी झाला . आणि त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणातील प्रकरण आणि या प्रकरणी राधिकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
यवतमाळ हादरलं; दुहेरी हत्याकांड, कौटुंबिक वादातून हत्या