मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800 (फोटो सौजन्य - pinterest)
यवतमाळ शहरात एकाच दिवशी हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालत त्याचा निर्घृण हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करत जावयाची हत्या केली. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Lawrence Bishnoi : एका व्यक्तीला उडवणार; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला मोठी धमकी
कौटुंबिक वादातून भावानेच केली भावाची हत्या
कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील बालाजी मंगल कार्यालयास जवळ घडली असून प्रमोद पंढरीनाथ पेंदोर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर कवीश्वर पंढरी पेंदोर असे लहान भावाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपळगाव परिसरातील बालाजी मंगल कार्यालयाजवळ नृत्य प्रमोद हा उभा होता. यावेळी त्याचा लहान भाऊ कवीश्वर तेथे आला तसेच दोघांमध्ये कौटुंबिक काढणातून वाद झाला. त्यानंतर काही क्षणातच कवीश्वरने लोखंडी रोडने प्रमोदच्या डोक्यावर आठ ते दहा वार केले. यात प्रमोद चा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहे.
जावयाची हत्या
तर यवतमाळ शहरात दुसरी घटना ही भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून घडली आहे. भांडणात मध्यस्थी केल्याने जावयाची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. शेरूचा 19 वर्षापूर्वी राधिकाशी प्रेम विवाह झाला होता. राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता त्यावेळी वाद वाढू लागल्याने मध्यस्थी केल्याच्या रागातून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात शेरू गंभीर जखमी झाला . आणि त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणातील प्रकरण आणि या प्रकरणी राधिकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
यवतमाळ गेल्या तीन महिन्यापासून १५ खुनांचा घटना घडल्या आहे याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे .