File Photo : Clashes
सांगोला : लघुशंका करण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात जबर मारहाण झाली. ही घटना 16 डिसेंबर रोजी सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे घडली होती. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! वर्षभरापूर्वी झालेल्या खूनप्रकरणाचा आता घेतला बदला; देशी कट्ट्याने गोळीबार केला अन्…
याबाबत, फिरदोस अल्लारखा खतीब (रा. मुजावर गल्ली, सांगोला) व पंडित बळीराम सुरवसे (रा. कडलास नाका, सांगोला) यांनी गुरुवारी (दि.1) सांगोला पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा यासह दोन अनोळखी इसम तसेच मोहसीन खतीब, अल्लारखा खतीब, मोहम्मद मुलाणी यासह इतर चार ते पाच अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पंडित सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी मोहसीन खतीब, त्याचा भाऊ अल्लारखा खतीब, मोहमद मुलाणी यासह इतर ४ ते ५ इसमांनी संगनमताने जातिवाचक शिवीगाळ करून, तुला बघून घेतो असे म्हणून फिर्यादी व त्याचा मुलगा अमित सुरवसे यांना लोखंडी सळईने, हातांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली.
तर फिरदोस अल्लारखा खतीब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या राहत्या घराच्या बाजूला आरोपी पंडित सुरवसे याचा कामगार सुधीर वर्मा हा लघुशंका करत होता. त्यावेळी फिर्यादीच्या पतीने त्यास जाब विचारला असता पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा व इतर अनोळखी दोन इसमांनी संगनमताने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुण्यातही लघुशंकेवरून वाद
पुण्यातील थेऊर भागात उघड्यावर लघुशंका करताना सुरक्षा रक्षकाने हटकले. याचा राग आल्यामुळे टोळक्याने हवेत गोळीबार करत सुरक्षा रक्षकासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने लोणी काळभोर परिसरात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
हेदेखील वाचा : काय सांगता ! पार्टीत अगोदर मटण खाल्ले म्हणून मित्राला फावड्याने मारहाण; पुढे जे काही झाले…