वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
खापरखेडा : नागपूर शहरातील शंकरनगर चौक पेट्रोल पंपाजवळ वर्षभरापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेचा बदला घेण्यासाठी गुरुवारी (दि. 2) बाबुळखेडा चिचोली शिवारात देशी कट्टयाने गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक व्यक्ती ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पवन धीरज हिरणवार (28, रा. काचीपुरा, नागपूर) असे मृताचे तर शैलेश उर्फ बंटी हिरणवार (31) असे जखमीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : काय सांगता! पार्टीत अगोदर मटण खाल्ले म्हणून मित्राला फावड्याने मारहाण; पुढे जे काही झाले…
गुरुवारी दुपारच्या सुमारास पवन हिरणवार, शैलेश उर्फ बंटी हिरणवार आणि इतर तीन साथीदार (एमएच- 47/बीके-0323) क्रमांकाच्या कारने बाबुळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन निघताना आरोपींनी देशी कट्ट्याचा वापर करून त्यांची कार थांबवली. यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पळत जात असताना गोळीबार झाला. पवन हिरणवारच्या डोक्यात दोन तर छातीवर एक गोळी लागली. ज्यामुळे त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. शैलेश उर्फ बंटी हिरणवारला दोन गोळ्या लागल्या असून, तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक देशी कट्टा आणि एक चाकू जप्त केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मेयो रुग्णालयात हलविण्यात आले.
दुचाकीने आले आरोपी
पवन आणि त्याचे साथीदार पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आरोपींना होती. आरोपी दुचाकीने घटनास्थळी आले होते. काही पोलिसांच्या मते, आरोपींना कुणीतरी माहिती दिली असावी. घटनास्थळी दोनपेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शंकरनगर पेट्रोल पंपाजवळ सरोज खानचा खून
पवन हिरणवार आणि त्याच्या टोळीने वर्षभरापूर्वी शंकरनगर पेट्रोल पंपाजवळ सरोज खानचा खून केला होता. त्यानंतर त्याच्या भावाने, शेफू खान, बदला घेण्याच्या तयारीत होता. या घटनेच्या दिवशी शेफू खान आणि त्याचा साथीदार परवेश गुप्ता यांनीच गोळीबार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा: Pune Crime: ‘मुलीशी बोलल्याने पालकांना आला राग’; अल्पवयीन मुलासोबत केले असे काही की…, हैराण व्हाल