फटाक्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त (Photo : Police Action)
दिवाळी सणानिमित्त सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. यंदा बनावट फटाके बाजारात असल्याचे समोर आले आहे. त्याच धर्तीवर, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्यांच्या ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ अंतर्गत चिनी बनावटीच्या फटाक्यांची मोठी खेप भारतात तस्करीच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न उधळून लावला. अंदाजे ४.८२ कोटी रुपये किमतीचे हे फटाके मुंबईजवळील न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आले.
चीनहून आलेला अंकलेश्वर येथील इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) येथे जाणारा ४० फूट लांबीचा कंटेनर डीआरआय अधिकाऱ्यांकडून तपासणीसाठी थांबवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये ‘लेगिंग्ज’ असल्याचे सांगण्यात आले होते. सखोल चौकशीत असे दिसून आले की, कंटेनरच्या समोरील कपड्यांच्या थराच्या मागे ४६६४० फटाके लपवण्यात आले होते. डीआरआयच्या मते, संपूर्ण खेप जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर डीआरआयने केलेल्या झडतीत गुन्हेगारी कागदपत्रे उघड झाली, त्यातून तस्करीच्या टोळीची कार्यपद्धती उघड झाली. गुजरातमधील वेरावळ येथून या प्रकरणात एका प्रमुख संशयिताला अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, फटक्यांसारख्या धोकादायक वस्तूंच्या बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्त्वाच्या बंदर पायाभूत सुविधा तसेच व्यापक लॉजिस्टिक्स साखळीला गंभीर धोका निर्माण होतो. डीआरआयचे अधिकारी धोकादायक तस्करीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी आणि भारताच्या व्यापार आणि सुरक्षा परिसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या संघटित तस्करी नेटवर्क्सना नष्ट करण्यासाठी सतर्क असल्याचे यातून दिसून आले.
वेळोवेळी केली जातीये कारवाई
दुसऱ्या एका घटनेत, घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या-मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा पर्दाफाश नुकताच करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकाने ही कारवाई केली आहे.