Crime news live updates
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणे आणि त्रासदायक कॉल करणे या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमोल काळे (वय 25) असे आरोपीचे नाव असून, अश्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला अटक केली.
02 May 2025 06:16 PM (IST)
खानवटे (ता. दौंड) येथील उजनी धरण पात्रात अवैध माती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर दौंड मधील महसूल, पोलीस आणि उजनी उपसा सिंचन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अवैध माती उपसा करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर या पथकाने कारवाई करून सदर ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या उजनीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे, नदीचे पात्र मोकळे झाल्याने माती चोरांनी अवैध माती उपसा सुरू केला आहे.
02 May 2025 04:47 PM (IST)
नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेत भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
02 May 2025 04:12 PM (IST)
उल्हासनगर शहरातील पाणी टंचाईच्या मुद्यावरून उल्हासनगर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला.
02 May 2025 04:09 PM (IST)
राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात एका १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
02 May 2025 03:30 PM (IST)
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लव्ह जिहाद प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी आता या टोळीच्या निधी कनेक्शनची देखील चौकशी करेल. भोपाळमधील काही कुख्यात गुन्हेगार आरोपींना निधी पुरवत असल्याची माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी फरहान, अली आणि साद हे तिघेही महागडी जीवनशैली जगत होते. तर त्याचे कुटुंब खूप साधे आहे. साध्या कुटुंबातील असूनही, फरहानकडे सुमारे ३ लाख रुपयांची स्पोर्ट्स बाईक होती. तर अलीला महागड्या घड्याळांची आवड होती. तपासादरम्यान आरोपी पीडित मुलींना महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जात असे हे देखील समोर येत आहे.
02 May 2025 02:38 PM (IST)
कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात बुधवारी रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाच्या चौकशीवरून वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे भांडण सोडण्यासाठी आलेल्या महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली. याबाबत नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
02 May 2025 01:40 PM (IST)
शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ४६ वर्षीय व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
02 May 2025 01:10 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बाजारभावापेक्षा कमी दराने बिलासहीत सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या सुभाष संकपाळ, साक्षी सुभाष संकपाळ (दोघी रा. नांदणी रोड यड्राव) व विकी आगवाणी (रा. आसरानगर हनुमान मंदिर चौक) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यापैकी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रेश्मा चाँदसाहेब जमादार यांनी फिर्याद दिली आहे.
02 May 2025 12:51 PM (IST)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानला भारताच्या सर्व घडामोडींची माहिती हवी आहे. त्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने (आयएसआय) भारतात गुप्तहेर ठेवले आहेत. राजस्थान इंटेलिजन्सने पाकिस्तानला माहिती देणाऱ्या एका गुप्तहेरास पकडले आहे. जैसलमेरमधील मोहनगढ भागातून आयएसआय एजंट पठान खान (40) याला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय लष्काराची गोपनीय माहिती, व्हिडिओ, फोटो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवत होता.
02 May 2025 12:26 PM (IST)
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव हा १८ व्या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
02 May 2025 11:46 AM (IST)
दुचाकीवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. मात्र, गस्तीवरील पोलिस दिसताच गडबडीत पळताना सोनसाखळी काही अंतरावर पडली. सीसीटिव्ही कॅमरे पाहताना काहीतरी पडल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तो परिसरत पिंजून काढला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हिसकावलेली सोनसाखळी त्या महिलेला परत मिळाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चिखलीतील शिवाजी पार्क परिसरात घडली.
02 May 2025 11:45 AM (IST)
शिंदोडी (ता. शिरुर) येथील घोड धरण परिसरातून चक्क साडे सहा लाख रुपयांची माती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, अशाप्रकारची घटना घडल्याने शिरुर पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 May 2025 11:33 AM (IST)
उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पतीची दाढी आवडत नसल्याने पत्नी भावासोबत म्हणजेच दीरासोबत पळून गेली. यानंतर पतीने पत्नीला तिहेरी तलाक देण्यात आला आहे. अर्शीला तिचा पती शकीरसोबत नाही तर दीर साबीरसोबत राहायचे आहे. ती म्हणाली- मी माझ्याद दीरासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. बराच गोंधळ झाल्यानंतर पती शाकीरने पत्नी अर्शीला तिहेरी तलाक दिला आणि म्हणाला, तिला माझी दाढी आवडत नाही, ती तिची इच्छा आहे. पण मी मौलाना आहे आणि माझ्यासाठी माझी दाढी माझ्या पत्नीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.
02 May 2025 10:58 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पती-पत्नी दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर तिघांनी हल्ला करत लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पतीवर हल्ला करण्यासाठी पत्नीनेच सुपारी दिली होती. यानंतर लूटमार केलेले दागिने पत्नीने घेतले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली.