Crime news live updates
चाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एका 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार 13 मे रोजी उशिरा घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली आहे. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. दरम्यान आरोपीने आपला कबुली जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.
16 May 2025 05:32 PM (IST)
पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, नऱ्हे व लोहगावमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. दोन्ही घटनांमधील चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागलेला नाही. शहरात गेल्या काही वर्षांपासून घटफोड्यांचे प्रकार वाढले असल्याचे दिसत असताना पोलिसांना याला आवर घालण्यात अपयश येत आहे.
16 May 2025 05:21 PM (IST)
उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये एका महिला होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी गेली असताना, सहा तरुणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत
16 May 2025 03:56 PM (IST)
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनंता पांडुरंग गायकवाड (वय ४२ वर्षे रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
16 May 2025 02:04 PM (IST)
राज्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल अपघाताचे प्रकरण समोर आले असून, पानशेत-पुणे रोडवरील मनेरवाडी गावाजवळ उलट्या दिशेने आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून चालक पसार झाले आहे. अनिकेत अरुण भालेराव (वय ३५, रा. वरदाडेवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वकिलांचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काका शांताराम भालेराव यांनी तक्रार दिली आहे.
16 May 2025 12:26 PM (IST)
उल्हासनगर पोलिस स्टेशनच्या स्टेशन हाऊस ऑफिसरने सांगितले की, पोलिसांना सकाळी ११:४५ वाजता माहिती मिळाली. यानंतर, एक पथक उल्हासनगर कॅम्प-१ परिसरातील त्याच्या घरी (हर्ष कॉटेज) पोहोचले आणि जोहरी, त्याची पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांचे मृतदेह बाहेर काढले.
16 May 2025 12:01 PM (IST)
बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली कोसळली. त्यातून ती बचावली आहे. ९९ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून चोरटे पळून गेले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
16 May 2025 11:47 AM (IST)
पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांना हेरून ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या पाठिमागून जात मदतीचा बहाण्याने त्यांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद सुरूच आहे. पुन्हा एकदा नवी पेठेतील शास्त्री रोड परिसरात एका नागरिकाला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा केला. मात्र, पैसे निघत नाही म्हणून एटीएम कार्डाची अदलाबदल केली आणि नंतर कार्डचा गैरवापर करून तब्बल ४८ हजार रुपयांची रोख रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बद्रीनाथ शांतीनाथ बनसोडे (वय ४५, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
16 May 2025 11:34 AM (IST)
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या हत्येप्रमाणेच उत्तर प्रदेशमधील बलियामध्येही एक घृणास्पद हत्याकांड उघडकीस आलं आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एवढेच नाही तर पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठीकाणी फेकण्यात आले.
16 May 2025 11:33 AM (IST)
पुणे स्टेशन परिसरातील सोहराब हॉलजवळ भरधाव कारच्या धडकेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ४५, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ, रा. ओडिशा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.