मुंबई : मयत डॉ. मुरलीधर नाईक (Dr Murlidhar Naik) यांना रात्री उठण्यास त्रास होत असल्याने गेल्या जानेवारी २०२३ पासून हेल्थ केअर ऐट होम इंडिया प्रा. लि.(Health Care At Home India Pvt Ltd) या कंपनी मार्फत एक केअर टेकर (Care Taker) ठेवला आहे. सदरचा केअरटेकर त्याच्या मूळ गावी गेल्याने दिनांक 1 मे 2023 पासून त्याजागी आरोपी नाव कृष्णा मनवहादूर परिहार (Krishna Manavahadur Parihar), वय ३० वर्षे याची केअर टेकर म्हणून कंपनीतर्फे नियुक्ती करण्यात आली होती.
7 मे २३ च्या रात्री 09.00 वाजल्यापासून ते 8 मे 23 रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान मयत इसम नामे डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक, वय 86 वर्षे यांच्या तोंडावर आरोपीने सेलो टेप लावून तोंड बंद करून, दोन्ही हात पाठीमागे बांधून खून केला व मयत इसमाने गळयातील अंदाजे २० ग्रॅम वजनाची सोन्याची व साधीच मिक्स माळ होती ती खून करून जबरी चोरी करून पळून गेला.
सांताक्रुझ पोलीस ठाणे, मुंबई येथे 8 मे 23 रोजी 414/2023, कलम 394,302 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यात मयत इसम नामे डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक,वय ८६ वर्ष पत्ता- ३०२, हेलेना बिल्डिंग, सेंट्रल अवेन्यू सांताकझ (प), मुंबई हे असून ते फॉर्मासिटमध्ये पीएचडी आहेत. त्यांच्या सोबत नमूद पत्त्यावर त्याची पत्नी श्रीमती उमा मुरलीधर नाईक वय 84 वर्षे या राहतात. मयत इसम यांना दोन विवाहित मुलगे व एक विवाहित मुलगी असून ते मुंबईत इतरत्र राहतात.
[read_also content=”अँटिलिया स्फोटक प्रकरण: आरोपी सुनील मानेकडून माफीदाराचा अर्ज मागे, विशेष न्यायालयात केला होता अर्ज https://www.navarashtra.com/maharashtra/antilia-explosives-scare-case-amnesty-plea-from-accused-sunil-mane-withdrawn-application-filed-in-special-court-nrvb-396912.html”]
सदरची माहिती प्राप्त होताच अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 9 मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरणाची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना कामाची विभागणी करून देण्यात आली. सदर आरोपीने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता तसेच त्याच्या राहण्याचा निश्चित ठावठिकाणा नसताना प्राप्त माहिती व तांत्रिक तपासामध्ये आरोपीने बोरीवली येथून सौराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन पकडली असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यास जी.आर.पी.एफ. पथक, अहमदाबाद यांच्या सहाय्याने 12 तासांच्या आत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 9 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-9-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
सदरची कामगिरी मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 9 मुंबई व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सांता विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांताक्रुझ पोलीस ठाणे, मुंबई, पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, अमर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लहाने, तुषार सांवत, सुयोग अमृतकर, उमेश सोनवणे, विजय इंगळे, पोलीस उप निरीक्षक धनंजय आव्हाड, हणमंत पाटील, सफौक. 29600 / इनायतुल्ला मोकाशी तसेच पश्चिम प्रादेशिक विभागातील अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक किशोर परकाळे, पो.ह.क. 33154/ राजेंद्र पेडणेकर, पोशिक. 060358/ प्रविण जाधव व पोशिक 130463 / विजय मोरे यांनी सदरची कामगिरी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.