Ovarian cancer संबंधित गैरसमजुती आजच करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती
ओव्हरियन कॅन्सरशी संबंधित अनेक गैरसमजुती या अंडाशयाच्या गाठी सारख्या इतर स्त्रीरोगविषयक समस्यांमुळे निर्माण होतात. पण यामागची वास्तविकता आणि गैरसमजुतींमधील मुख्य फरक ओळखण्याची वेळ आली आहे. हा लेख अंडाशयाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमज दूर करण्यास मदत करतो.डॉ. मधुलिका सिंग, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पिटल, पुणे, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
ओव्हरियन कॅन्सर म्हणजे महिलांच्या अंडाशयातील पेशींमध्ये होणारी अनियंत्रित वाढ. हा कॅन्सर बहुतेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे न देता वाढत जातो, म्हणूनच तो उशिरा आढळतो. याचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही, परंतु वय, कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक बदलांमुळे (BRCA) याचा धोका वाढतो. या कर्करोगाची लक्षणे म्हणजे सतत पोट फुगणे, ओटीपोटात किंवा पोटात दुखणे, लवकर पोट भरल्यासारखे वाटणे, वारंवार लघवी होणे आणि वजनात अचानक बदल होणे. म्हणून, ओव्हरियन कॅन्सर संबंधित गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
वास्तविकता: एक सामान्य गैरसमज आहे की ओव्हरियन कॅन्सर फक्त वृद्ध महिलांना होतो. जरी हा ५० आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असला तरी, तो कोणत्याही वयात होऊ शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबात ओव्हरियन कॅन्सरचा वैद्यकिय इतिहास आहे किंवा अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्यांनी सतर्क राहावे आणि नियमित तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आणि त्यांच्या सूचनांचे न चुकता पालन करणे गरजेचे आहे.
वास्तविकता: जरी कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढू शकतो, तरी ओव्हरियन कॅन्सर असलेल्या बहुतेक महिलांच्या कुटुंबात या आजाराचा इतिहास नसतो. BRCA1 आणि BRCA2 यांसारखे घटक देखील या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच सर्व वयोगटातील महिलांसाठी नियमित तपासणी आणि जागरूकता महत्त्वाची आहे.
वास्तविकता: सध्या, वैद्यकीय संशोधन आणि उपचारांमधील प्रगतीमुळे ओव्हरियन कॅन्सर चे रोगनिदान सुधारले आहे. वेळीच निदान आणि आधुनिक उपचार पद्धती महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. म्हणून, वेळेवर वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
वास्तविकता: अनेक महिलांचा असा विश्वास आहे की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पॅप स्मीअर चाचण्यांमुळे ओव्हरियन कॅन्सरचीही तपासणी होते. तथापि, पॅप स्मीअर चाचणी ओव्हरियन कॅन्सर शोधत नाही, परंतु ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यास मदत करते. ज्या महिलांना जास्त धोका आहे किंवा ज्यांना पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे, खाण्याच्या सवयींमध्ये बदल, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना, पाठदुखी, मासिक पाळीत बदल आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात, त्यांना तज्ञांकडून ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड आणि CA-125 रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो. वेळीच निदान आणि उपचारांसाठी लक्षणे आणि जोखमीच्या घटकांची माहिती असणे गरजेचे आहे.
Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती
वास्तविकता: अंडाशयातील गाठी ओव्हरियन कॅन्सरपेक्षा वेगळ्या असतात. या गाठी सौम्य असू शकतात, म्हणजेच त्या कर्करोगाच्या असतीलच असे नाही आणि उपचारांशिवाय त्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. ज्या गाठी आकाराने मोठ्या असतात, त्यांची तपासणी करून त्या कर्करोगाच्या नाहीत याची खात्री करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व गाठी धोकादायक असतात, तर स्त्रीरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने यापुढील तपासणी करणे योग्य राहिल. या गाठीला कर्करोग समजून घाबरून जाऊ नका. तज्ञ तुमच्या अंडाशयातील गाठ आणि कर्करोग यांच्यात फरक ओळखून त्याचे अचूक निदान करण्यास मदत करतील.
Ans: स्त्री प्रजनन प्रणालीमधील अंडाशयात (जिथे अंडी आणि हार्मोन्स तयार होतात) अनियंत्रितपणे पेशी वाढून तयार होणारी कर्करोगाची गाठ आहे.
Ans: पोटाचा घेर वाढणे किंवा पोट फुगणे, ओटीपोटात सतत वेदना होणे
Ans: गाठ वेगाने वाढणे, कठीण असणे, सतत दुखणे किंवा सुन्न वाटणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात.






