माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
पोलिसांनी सुरू केला तपास
हैदराबादमधून जावेद नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती
भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना शारीरिक हिंसा आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पत्रांमध्ये अश्लील आणि आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नवनीत राणा यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे. हे पत्र हैद्राबादमधील ‘जावेद’ नावाच्या एका व्यक्तिने पाठवले असल्याचे समोर आले आहे.
ज्या दिवशी नवनीत राणा यांना हे जीवे मारण्याची धमकीचे पत्र प्राप्त झाले, त्या दिवशी त्यांच्या स्वीय सहाय्यकाने असणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यावर अमरावती पोलिसांनी तातडीने याकहा तपास सुरू केला आहे.
अज्ञात आरोपी असलेल्या जावेदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कुठे आहे त्याचे लोकेशन कुठे आहे यासाठी तपास सुरू केला गेला आहे. धमकी देण्याचे कारण देखील शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवनीत राणा यांना धमकी मिळणे ही पहिल्यांदाच घडलेली गोष्ट नाहीये. याआधी देखील अनेकदा माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत.
प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला जीवे मारण्याची धमकी
“मेरा भोला है भंडारी” फेम गायक हंसराज रघुवंशी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील एका सदस्याने या धमकीची जबाबदारी स्वीकारली आहे. गायक आणि त्याच्या कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गायकाचा सुरक्षारक्षक विजय कटारिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मशहूर गायक हंसराज रघुवंशीला धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतः सांगितले की तो लॉरेंस बिश्नोई गँगचा सदस्य आहे. मोहाली पोलिसांनी सिंगरच्या पर्सनल गार्डच्या तक्रारीवर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीची ओळख राहुल कुमार नागड़े अशी पटली असून तो मध्य प्रदेशच्या उज्जैनचा रहिवासी आहे.






