दिल्ली : दिल्लीतील नोएडा एका भयानक हत्येने हादरले आहे. एका महिलेचा मुंडक छाटलेला मृतदेह हा एका नाल्यात आढळून आला. पोलिसांकडे आई हरवल्याची तक्रार आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र तपासात धक्कादायक सत्य समोर आले. एकाच कंपनीत काम करणाऱ्या प्रेम संबंध असणाऱ्याने आपल्या प्रेयसीच जीव घेतला आणि चालत्या गाडीत हत्या करून त्याने मृतदेह नाल्यात फेकून दिला. मात्र पोलीस तपासात जे सत्य समोर आल ते हादरून सोडणारे आहे. एकाच कंपनीत दोघे कामाला होते. दोघांची पण लग्न झालेली होती. कंपनीत काम करत असताना त्याला त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्याने तिची हत्या करायचं ठरवलं.
प्रेयसीची हत्या करायचं कारण काय ?
मोनू सोलंकी अस हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला पाच मुल आहेत. त्याच कडे राहणारी दोन मुल ही त्याच्या प्रेयसीची आहेत. तिचे दोन लग्न झाली होती, मात्र दोन्ही पतींनी तिला सोडून दिलं. मोनूच ही लग्न झाल होत. प्रेयसीने ब्लैकमेल करायला सुरवात केली आणि मुलींकडून अनैतिक कृत्य करून घेण्याची धमकी पण दिली. त्या नंतर मोनूने आपल्या प्रेयसीची हत्या करायच ठरवल आणि ५ नोव्हेंबरला एका चालत्या बस मध्ये त्याने हत्या केली.
बस मध्ये केला अंधार आणि मृतदेह नेवून टाकला
मोनूने तिचा मृतदेह हा एका बस मधून नेला. ती एक धार्मिक संस्थेची बस होती. त्यामध्ये त्याने असलेली लाइट बंद केली. लाइट बंद करून तो बस चालवत होता. तिचे आधी मुंडके छाटल आणि त्या नंतर त्याने मृतदेह हा एका नाल्यात फेकून दिला. आई घरी येत नाही ही तक्रार मुलीनी पोलिसांत दिली आणि त्या नंतर मोनूचा शोध सुरू झाला. मोनू हा घरी येत नसल्याने तो सापडत नव्हता. एके दिवशी मोनू घरी आला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोनूने पोलीस तपासात धक्कादायक खुलासे केले. ते म्हणजे ती त्याला ब्लैक मेल करत होती. याला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मोनूला सध्या अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारजवळ महिलेची मान, तिचे दोन्ही हात, कपडे आणि धारदार शस्त्रे जप्त केली. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं.
सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्…
Ans: नोएडा
Ans: मोनू
Ans: नाला






