सुभद्रा नदी यासाठी अधिक प्रसिद्ध असून येथे तुम्हाला नदीकाठी अनेक हाडे, सांगाडे आणि कवट्या दिसतात. येथे काळ्या जादूचा खूप वापर केला जातो. येथे अनेक तांत्रिक काळी जादू करताना आढळतात
शिरोली : कोल्हापूरच्या पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत काही दिवसांपूर्वी अघोरी विधी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर हा मांत्रिक किशोर लोहार असल्याचे समजले. पोलिसांत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मांत्रिक व त्याचे साथीदार फरार झाले होते. बुधवारी रात्री पोलिसांनी या मांत्रिकाला व त्याच्या साथीदाराला शिरोली येथील राहत्या घरातून अटक केली.
अटक केल्यानंतर त्याचा व्हिडिओ पोलिसांनी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये सदर मांत्रिकाने आपली चूक मान्य केली आहे. अशा कुठल्या विधीने, जादूटोणा, भानामतीने कोणताही आजार बरा होत नाही, तसेच लोकांनी याला बळी पडू नये, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुलाची शिरोली फाटा येथील स्वागत कमानीपासून मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका (माळवाडी) पर्यंत मांत्रिक व त्याच्या साथीदाराची धिंड काढण्यात आली.
हेदेखील वाचा : Uttarpradesh Crime: मी तिच्याशिवाय राहू शकत नाही…, झाशी रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण, काय घडलं नेमकं?
दरम्यान, या मांत्रिकाचा कबुली व माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून तसेच गावातून धिंड काढून नागरिकांनी अशा थोतांडाना बळी पडू नये. नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी व त्यांचे प्रबोधन व्हावे. तसेच असे कर्मकांड केले तर कोणाचीही गय केली जाणार नाही. हा संदेश देण्यासाठी ही धिंड व व्हिडिओ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची प्रबोधनात्मक मोहीम पोलिसांच्या मदतीने हाती घेण्यात आली.
रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण
दुसरीकडे, उत्तरप्रदेशच्या झांसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत एक तरुण आढळला. संबंधित तरुणाला त्या अवस्थेत पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. तो सतत “माझ्या पत्नीला बोलवा, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत”. असे आसपासच्या लोकांना सांगू लागला. तिथल्या लोकांनी तुरट तरुणाचं बोलणं ऐकलं आणि त्याची गंभीर अवस्था पाहून स्थानिक रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.






