डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
शिरपूर जैन : शिरपूर येथे दिव्यांग अल्पवयीन मुलीचा एका नराधमाने विनयभंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.20) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी एका नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
15 वर्षीय दिव्यांग मुलीची आई सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावातील कांता साहेबराव खाडे यांच्या शेतातील हरभरा घाटे वेचण्याकरिता गेली होती. काम करून दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान शेतातून घरी येत असताना तिला तिची दिव्यांग अल्पवयीन मुलगी व शेजारी राहणारा दिनकर देवराव लहाने हे दोघे तिला तिच्या गोठ्यात जात असताना दिसले. त्यावेळी पीडितेची आई सुद्धा त्यांच्या मागे गोठ्यात गेली. यावेळी वाईट उद्देशाने दिनकर लहाने याने दिव्यांग अल्पवयीन मुलीचा हात धरला होता. पीडितेच्या आईने मुलीचा हात कशाला धरला? असा आवाज ऐकून नराधम मुलीचा हात सोडून निघून गेला.
पीडितेच्या आईने सर्व घटना तिच्या पतीला सांगितली. पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. 22) शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी दिनकर देवराव लहाने (60, रा. करंजी) या नराधमाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी त्र्यंबक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय द्वारका अंभोरे करीत आहेत.
महिला शौचाला जात असताना विनयभंग
दुसऱ्या एका घटनेत, करंजी येथील रहिवासी विवाहित महिला शौचाला जात असताना करंजी गावातच राहणारा आरोपी ज्ञानेश्वर लहाने याने पीडित महिलेचा पाठलाग गेला. त्यानंतर त्याने त्या महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार महिलेने पतीला सांगितला. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. पीडितेने 5 फेब्रुवारी रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
संग्रामपूर तालुक्यातील शेत शिवारात एका साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. 6) उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कालुसिंग निगवाले (21 रा. डोईफोडिया, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका आदिवासी गावातील रहिवासी असलेल्या अंदाजे साडेचार वर्षीय मुलीला 21 वर्षीय नराधामाने शेत शिवारात घेऊन गेला आणि अत्याचार केला.