बेळगाव: प्रेमविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोघांनी रिक्षामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हिरेंनंदी गावात घडली आहे. ही घटना उजेडात येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे.
मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
खळबळजनक ! तरुणाचं रात्रीचं ‘ते’ जेवण ठरलं अखेरचं; क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने दगडाने ठेचलं
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
स्वप्निल गोसावी (वय 30, रा. हुडको कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री स्वप्निल जेवण करण्यासाठी नारा रोडवरील सावजी भोजनालयात गेला होता. या दरम्यान त्याचा तेथे काही तरुणांशी वाद झाला. भोजनालयात उपस्थित इतर लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडवला. त्यानंतर स्वप्निल दुचाकीने घराकडे निघाला. त्याच्या मागेच आरोपीही तेथून निघाले. नारा रोडवर आरोपींनी स्वप्निलला गाठले. जबर मारहाण केल्यानंतर रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.
दरम्यान, स्वप्निलला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्वप्निलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेचा तपास करत होते.
हत्येचे नेमकं कारण अस्पष्ट
स्वप्निलची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, स्वप्नीलचं काही तरुणांसोबत भांडणं झालं होतं. यानंतर त्यांनी स्वप्नीलला दगडाने मारून गंभीर जखमी केलं. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.