Middle East Unrest : 'सगळं उडवून देऊ...', इराणच्या निशाण्यावर आता पैशांची तिजोरी? मुस्लिम देशांना दिला 'हा' थेट इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या संयुक्त लष्करी कमांड, खातम अल-अंबिया हेडक्वार्टर्स ने बुधावरी एक मोठी धक्कादायक घोषणा केली आहे. इराणने त्यांच्या निशाण्यावर आता मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या बँका आणि आर्थिक संस्था असल्याचा इशारा दिला आहे. इराणच्या या घोषणेनंतर सौदी अरेबिया(Saudi Arabia), यूएई(UAE) , बहरीन, यांसारख्या देशांमधील प्रमुख आर्थिक केंद्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणने स्पष्ट केले आहे की, या संस्थांची ओळख पटवली असून कोणत्याही क्षणी त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. धक्कादायक म्हणजे दुबई हे मध्यपूर्वेतील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. येथून हजारो आंतरराष्ट्रीय बँका आणि गुंतवणूकीच्या संस्था आहेत. यांना धोका निर्माण झाला आहे.
इराणने आतापर्यंतच्या युद्धात मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळे, सीमावर्ती भाग आणि दूतावांसावर हल्ले केले होते. परंतु आता आपल्या रणनीतीत बदल करत बँका आणि आर्थिक संस्था टार्गेट केल्या आहे. या धमकीने अरब देशच नव्हे, संपूर्ण जगभरात अस्थिरता निर्माण जाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील आर्थिक केंद्रांवरील हल्ले थेट जागतिक शेअर बाजार आणि कच्चा तेलाच्या(Crude Oil) किंमतींवर परिणाम करेल. दुबई सारख्या शहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे. आशा परिस्थिती या केंद्रावर कोणतेही हल्ले जगाला आर्थिक संकटात टाकू शकतात.
सध्या इराणने आपल्या युद्ध रणनीतीत अचानक बदल केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडच्या इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात तेहरानमधील एका बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इराणचा दावा आहे की ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यांना इराणने क्रूर ठरवत थेट जागतिक आर्थिक सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली आहे.
Ans: इराणने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये त्यांच्या काही आर्थिक हिताशी संबंधित लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील आर्थिक केंद्रांना उडवून देण्याची धमकी इराणने दिली आहे.
Ans: इराणच्या धमकीमुळे सौदी अरेबियातील रियाध, यूएईतील दुबई आणि बहीरनमधील मनामा सारख्या मोठ्या आर्थिक केंद्रामध्ये असलेल्या बँका आणि गुंतवणूक संस्था धोक्यात आल्या आहेत.
Ans: इराणने मध्यपूर्वेतील बँकावर हल्ला केला जागतिक शेअर बाजार, गुंतवणूक आणि तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता वाढू शकते.






