(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
UAEचा वेगवान गोलंदाज झहूर खानने एक खळबळजनक दावा केला आहे. त्याने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याचा घातक स्लोअर बॉल स्टाईल डेव्हलप करण्यासाठी त्याने मदत केली असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या झहूरने हा खुलासा केला आहे. त्याने 2019 च्या IPLमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेट बॉलिंग करत असताना बुमराहला त्याची अॅक्शन न बदलता स्लोअर बॉल टाकण्याची टेकनीक शिकवली होती.
झहूरने आठवण करून दिली की 2019 च्या IPLमध्ये यूएईमध्ये झालेल्या उष्णतेमुळे आणि दव पडल्याने गोलंदाजांना मोठ्या समस्या आल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “बुमराह आधी हळू बॉल टाकत होता, पण त्याची अॅक्शन सामान्य होती. अबूधाबीमधील एका सामन्यात बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नाथन कुल्टर-नाईल यांनी खूप धावा काढल्या. त्यावेळी यूएईमध्ये तापमान 50 अंश होतं आणि रात्री दव पडल्याने बॉल पकडणं कठीण झालं होते.”
टी10 लीगमधील कामगिरीमुळे झहूरला मुंबई इंडियन्सने नेट बॉलर म्हणून संबोधले. त्याच्या जादुई स्लोअर बॉलबद्दल झहूर म्हणाला, “मी पहिल्या बॉलवर यॉर्कर टाकला आणि पुढचे पाच बॉल स्लोअर होते. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला ओळखत होते. रोहित शर्मा आणि बुमराह तिथे बसून पाहत होते. मी त्यांना सांगितले की त्याच अॅक्शन आणि त्याच ग्रिपने हे शक्य आहे. बुमराहने आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” मी म्हणालो की मी तुम्हाला प्रॅक्टिसच्या वेळी सांगेन.”
पुढच्या सराव सत्रात झहूरने जेव्हा त्याचे टेकनीक दाखवले तेव्हा मुंबई इंडियन्सचे दिग्गज प्रशिक्षकही स्तब्ध झाले. झहूरच्या म्हणण्यानुसार, “मी एक स्लोअर बाउन्सर टाकला ज्यामुळे फलंदाज पूर्णपणे गोंधळून गेला. शेन बॉन्ड (बॉलिंग कोच) यांनी मला विचारले की तो ऑफ-कटर आहे का? मी म्हटले, ‘नाही, ग्रिप सारखीच आहे.’ बॉन्ड जयवर्धनेला म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये हे काहीतरी नवीन आहे. तो त्याच अॅक्शन आणि आर्म स्पीडसह स्लोअर बॉल कसा टाकतोय ते बघूयात.'”
पुढे झहूरने स्पष्ट केलं की जगातील नंबर वन गोलंदाज त्याच्याकडून शिकण्यास आला. तो म्हणाला, “एक-दोन दिवसांनी, मी बुमराहसोबत गोलंदाजी करत होतो. त्याने मला विचारले, ‘पाजी, मला तुझी ग्रिप दाखव.’ मी त्याला माझे तंत्र दाखवले आणि सांगितले की ते त्याच अॅक्शनमध्ये असावे. बुमराहने ते वापरून पाहिले आणि म्हणाला, ‘ही नेक्स्ट लेव्हलची गोष्ट आहे.’ मी खूप प्रभावित झालो की इतका मोठा स्टार असूनही, त्याने मला तंत्र विचारले.”






