कंटेनरच्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू (फोटो- टीम नवराष्ट्र)
पाटस: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय दोघेही रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी ( दि. २)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीत चँनेल नं ७४+२०० चे ब्रिझ जवळ सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडु नारायण बनसुडे हे दुचाकीवरून मुलगा रूद्र याच्यासह जात असताना कुरकुंभ ब्रीजवर विरूध्द (चुकीच्या) दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून धडक दिली. या अपघात दोघांना डोक्याला,हाता-पायाला गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ह्या अपघातात मोटर सायकलचा चेंदामेंदा झाल्याने नुकसान झाले आहे. या अपघातानंतर कंटेनर वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला. त्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हरमाडा भागात अनियंत्रित डंपरने रस्त्यावर मृत्यूतांडव केले आहे.डंपर चालकाने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे. पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात पहिल्यांदा डंपरने एका कारला धडक दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू
डंपरने अनेक जणांना चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.






